शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"मला ट्रोल करणं हेच काही आमदारांचे काम, त्यांना भाजपला खुश करायचंय"

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 23, 2023 21:50 IST

भाजपाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी सोडलं मौन

ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: भाजपचा विचार स्विकारून त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटामध्ये मला टार्गेट करण्याची रणनिती ठरविण्यात आली आहे. हे त्यांच्यातील काहींकडूनच मला समजले. त्यासाठी माझ्यावर आरोप केले जात असून अजितदादांपूर्वी मीच भाजपसोबत जाण्यास आग्रही असल्याचे वक्तव्य हास्यास्पद आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली.

चिंचवड येथे शनिवारी (दि.२३) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, काशिनाथ जगताप आदी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, जिथे आहे आणि जी भूमिका घेतली. तिथून भाजप विरुद्ध खूप बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्या गटाने रोहित पवारांना टार्गेट करायचे, अशी रणनिती ठरवली. पण, गेलेल्या सर्वांनी आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात. माझ्यावर टीका करताना विचार करून करावी.

अजितदादांवर भाजपचा छोटा नेता बोलतो. तेव्हा हे सगळे गप्प बसतात. परंतु, माझ्यावर टीका करताना यांच्या उड्या पडतात. त्यांना भाजपला खूश करायचे आहे. सुनील शेळके यांचे आरोप हास्यास्पद आहेत. तर, राम शिंदे यांनी हवेत गोळ्या मारणे कमी केले पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना पैशांचे प्रलोभन दाखविल्याचा अंबादास दानवे यांनी म्हटले असेल, तर काही तथ्थ्यावर आधारित ते बोलले असतील. सरकारकडून शाळांचे सुरू असणारे खासगीकरण चुकीचेच असल्याचे पवार म्हणाले.

मलाही ऑफर असू शकते - रोहित पवार

प्रतिगामि विचारासोबत गेलेले नेते विकास निधी देताना ब्लॅकमेल करत असतील, तर ते चुकीचे आहे. यास भपकेबाजी करणारे लोक जबाबदार आहेत. सत्तेसाठी सगळे तिकडे केले असून मलाही त्यांच्यासोबत येण्याची ऑफर असू शकते. परंतु, पुढच्या रांगा सत्तेत गेल्या. त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही संघर्षाची ही भूमिका घेतली, असेही रोहित पवार म्हणाले.

निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार...

पवार म्हणाले, शिवसेनेच्या फुटीचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतील. हे शंभर टक्के खरे आहे. त्यानंतर कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने लावेल. ही भिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना वारंवार दिल्लीला जावे लागत असून ते शिंदे गटाविरुद्ध निर्णय घेणार नाहीत. न्यायालयाकडूनच निर्णय व्हावा, असा प्रयत्न सुरू असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा