प्रजासत्ताकदिनी रक्तदानाचा संकल्प

By Admin | Updated: January 24, 2017 01:59 IST2017-01-24T01:59:42+5:302017-01-24T01:59:42+5:30

श्री आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या युवा शाखेच्या वतीने जैन मुनी आचार्य प. पू. शिवमुनीजी म. सा. यांच्या अमृत महोत्सवी

Resolution of Blood Donation of the Republic | प्रजासत्ताकदिनी रक्तदानाचा संकल्प

प्रजासत्ताकदिनी रक्तदानाचा संकल्प

पिंपरी : श्री आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या युवा शाखेच्या वतीने जैन मुनी आचार्य प. पू. शिवमुनीजी म. सा. यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संपूर्ण भारतामध्ये करण्यात आले होते. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विविध विभागांमध्ये २६ जानेवारीला या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या उपक्रमात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय युवाध्यक्ष मोहनलाल चोपडा, राष्ट्रीय युवाध्यक्ष शशिकुमार कर्नावट, राष्ट्रीय मुख्य युवा संरक्षक पारस मोदी, राष्ट्रीय महिलाध्यक्ष रुचिरा सुराणा यांनी केले आहे. २६ जानेवारीला हे रक्तदान शिबिर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जैन संघ, युवक मंडळे आणि महिला मंडळे यांच्या वतीने प्रमुख जैन स्थानकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Resolution of Blood Donation of the Republic