शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीच्या काँग्रेस शहराध़्यक्षांचे राजीनामास्त्र म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:42 IST

तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे.

ठळक मुद्देप्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे मागे घेतल्याची केली घोषणा

पिंपरी : जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर समिती सदस्यांनीही राजीनामे दिले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने त्यांनी राजीनामे मागे घेतले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे लक्ष न दिल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपदी सचिन साठे यांची निवड झाली होती. सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईरांसह दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा पराभव साठे यांच्या जिव्हारी लागला होता. पक्षबांधणीसाठी प्रयत्न करूनही पक्षाने ताकद न दिल्याने पराभवास सामोरे जावे लागल्याची खंतही साठे यांनी व्यक्त केली होती. तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शहर समितीतील अन्य सदस्यांनीही राजीनामे दिले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे.याविषयी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे मागे घेतल्याची घोषणा केली. महाजन म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. समजूत काढली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामे मागे घेतले आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.   साठे म्हणाले, शहराध्यक्षपदाच्या कालखंडात मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. एक वर्षापूर्वी पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये पुढील कार्यकाळाकरिता अध्यक्षपदावर पुनश्च निवड केली होती. पदावर राहूनही कार्यकर्त्यांना व पक्षाला न्याय देऊ शकलो नव्हतो. त्यामुळे राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढली. त्यामुळे राजीनामे मागे घेतले आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण