सुरक्षा सप्ताहासाठी सुरक्षिततेची साधने मिळताहेत भाड्याने!

By Admin | Updated: March 8, 2016 01:01 IST2016-03-08T01:01:01+5:302016-03-08T01:01:01+5:30

काम एक दिवसाचे असो की चार दिवसांचे, ज्या कंत्राटदाराने काम कंपनीचे काम घेतले आहे. त्या कंत्राटदाराच्या कामगाराकडे सुरक्षासाधने असणे बंधनकारक आहे.

Renting security devices for safety week! | सुरक्षा सप्ताहासाठी सुरक्षिततेची साधने मिळताहेत भाड्याने!

सुरक्षा सप्ताहासाठी सुरक्षिततेची साधने मिळताहेत भाड्याने!

पिंपरी : काम एक दिवसाचे असो की चार दिवसांचे, ज्या कंत्राटदाराने काम कंपनीचे काम घेतले आहे. त्या कंत्राटदाराच्या कामगाराकडे सुरक्षासाधने असणे बंधनकारक आहे. वाहन उद्योगात अग्रेसर असलेल्या एका कंपनीत नियमाची काटेकार अंमलबजावणी होत असल्याने या कंपनीच्या परिसरात कामगारांना
बूट, हेल्मेट आणि अन्य सुरक्षा
साधने भाड्याने मिळतात. बूट, हेल्मेट,सुरक्षा साधने कंपनीच्या बाजूला असलेल्या टपऱ्यांवर उपलब्ध असल्याचे दिसून येते.
वाहन उद्योगात अग्रेसर असलेल्या कंपनीत कोणत्याही कामानिमित्त प्रवेश करायचा असेल, तर हेल्मेट असल्याशिवाय कंपनीत सोडलेच जात नाही. कंपनीत आत सीमाभिंतीचे बांधकाम, किरकोळ स्वरूपाचे प्लंबिंग काम असो, कारखान्यात प्रत्यक्षात उत्पादन प्रक्रियेशी संबंधित काम नसलेल्या कामगारांनाही सुरक्षा साधनांशिवाय प्रवेश दिला जात नाही. एक अथवा दोन दिवसांच्या किरकोळ कामासाठी कामगारांना तसेच कंत्राटदारांना हेल्मेट आणि बूट खरेदी करणे परवडणारे नाही. हेल्मेटची किंमत किमान ५०० रुपये, तर कारखान्यात वापरात येणाऱ्या बुटाची किंमत १२०० रुपये आहे. कंपनीकडून मिळालेले काम करून देणे भाग पडते. त्यामुळे ही सुरक्षा साधने खरेदी करण्यास पैसे घालविण्यापेक्षा तात्पुरत्या स्वरूपात गरज भागविण्यासाठी हेल्मेट आणि बूट भाड्याने घेण्याचा पर्याय कंत्राटदार आणि कामगारांना परवडणारा आहे.
एक दिवसासाठी २० रुपये भाड्याने हेल्मेट मिळते. तसेच प्रतिदिन २० रुपये भाड्याने बूटसुद्धा मिळतात. ५० रुपये अनामत रक्कम देऊन ही सुरक्षा साधने सहज उपलब्ध
होतात. रोज भाडे देऊन ही सुरक्षा साधने जेवढे दिवस काम, तेवढ्या दिवसासाठी घेता येतात.(प्रतिनिधी)

Web Title: Renting security devices for safety week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.