Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा
By प्रकाश गायकर | Updated: April 20, 2024 18:07 IST2024-04-20T18:06:11+5:302024-04-20T18:07:57+5:30
शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, वाकड, पिंपळे गुरव या भागात रिमझिम पाऊस पडला...

Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा
पिंपरी : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना शनिवारी (दि.२०) सायंकाळी आलेल्या रिमझिम पावसाने दिलासा मिळाला. सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजल्यानंतर अचानक आलेल्या पावसाने हवेमध्ये गारवा निर्माण झाला.
शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उन्हाची तीव्रता कमी होती मात्र उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, वाकड, पिंपळे गुरव या भागात रिमझिम पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली.
अनेक दुचाकीचालक रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये निवारा घेत होते. तर पुणे मुंबई रस्त्यावर असलेल्या ग्रेडसेपरेटरमध्ये अनेक दुचाकी चालक थांबले होते. सकाळपासूनच पिंपरी- चिंचवड शहरात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात बदल जाणवत होता. तीव्र उष्णतेपासून आज पिंपरी-चिंचवडकारांची काहीशी सुटका झाल्याचे चित्र आहे. सुमारे अर्धा तास पडत असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.