राजेश्री राऊत यांच्या उमेदवारीला दिलासा

By Admin | Updated: February 16, 2017 03:16 IST2017-02-16T03:16:12+5:302017-02-16T03:16:12+5:30

कुसगाव बुद्रुक गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संगीता गाडे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राजेश्री राऊत यांच्या विरोधात दाखल

Relaxation on Rajeshree Raut's candidature | राजेश्री राऊत यांच्या उमेदवारीला दिलासा

राजेश्री राऊत यांच्या उमेदवारीला दिलासा

वडगाव मावळ : कुसगाव बुद्रुक गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संगीता गाडे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राजेश्री राऊत यांच्या विरोधात दाखल केलेली अपुऱ्या प्रतिज्ञापत्राबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
त्यामुळे राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद गटासाठी २० तर पंचायत समिती गणासाठी ४५ उमेदवार आता रिंगणात असणार आहेत. कुसगाव बुद्रुक गणात भाजपाकडून संगीता गाडे, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टीकडून रचना घोमाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेश्री राऊत, तर शिवसेनेकडून उषा घोगे रिंगणात आहेत. न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे राऊत पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Relaxation on Rajeshree Raut's candidature