शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

त्रिवेणीनगर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन; पण समस्यांचा डोंगर; सहाशे कुटुंबांतील तीन हजार नागरिकांचे वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:40 IST

सहाशे कुटुंबांतील तीन हजार नागरिकांचे वास्तव्य : समस्यांचा डोंगर; इमारतींची कामे दर्जाहीन; पाण्याचा तुटवडा, स्वच्छतेचे प्रश्न गंभीर; सूर्यप्रकाश व रस्ता नसल्याने अनेक गाळेही बंद

- रामहरी केदार

चिखली : त्रिवेणीनगर येथील शरदनगर झोपडपट्टी व दुर्गानगर झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शरदनगर येथील भूखंडावर बारा मजली इमारती उभ्या करण्यात आल्या. त्यात सहाशे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. काहींना दुकाने देण्यात आली आहेत, मात्र त्यांना मूलभूत सुविधा योग्यप्रकारे मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.या प्रकल्पात दोन वेगवेगळ्या इमारती असून, एकात दुर्गानगर झोपडपट्टीतील रहिवासी व एकात शरदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले. या ठिकाणी शेकडो कुटुंबांचे वास्तव्य आहे. इमारतींच्या कामाची गुणवत्ता योग्य नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रहिवाशांच्या मुलांसाठी तळमजल्यावर अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे, परंतु लहान मुलांसाठी योग्य स्वच्छतागृह नसल्याने अंगणवाडी कर्मचारी व मुलांची कुचंबणा होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाटीबाबत समुपदेशन गरजेचे

या प्रकल्पात अंदाजे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने कष्टकरी व रोजंदारी करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मूलभूत सुविधा म्हणून कचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट, आरोग्य व शिक्षणासारख्या गोष्टींविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. 

घरांमध्ये पाण्याची गळती

इमारतींचे हस्तांतरण केल्यापासून वरच्या मजल्यावरील घरांमध्ये पाण्याची गळती होत आहे. यासंदर्भात विकसकाला वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी सेफ्टी ग्रील नसल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

या आहेत मुख्य समस्या...

घरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा नाही.पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तळमजल्यावर व कमी उंचीच्या. मैलामिश्रीत पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता.

सांडपाणी प्रक्रिया केंद्र अस्तिवात असूनही पुनर्वापरासाठी येणारे पाणी दुर्गंधीयुक्त.पार्किंग परिसरात मैलामिश्रीत पाणी साचल्याने दुर्गंधी.

सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या भूमिगत वाहिन्या कमी क्षमतेच्या.तळमजल्यावरील दुकानांकडे योग्य सूर्यप्रकाश व रस्ता नसल्याने अनेक गाळे बंद. 

काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. ज्या त्रुटी दिसून आल्या, त्या संदर्भातील दोषनिवारण करण्यात येईल व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रहिवाशांचे समुपदेशन करण्याचे नियोजन आहे. - सतीशकुमार खडके, मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पात दोन ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, सुविधा मिळत नसल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रकल्प विकसक व अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या समस्या समजून घेणे गरजेचे आहे.  - योगिता नागरगोजे, माजी नगरसेविका 

English
हिंदी सारांश
Web Title : Triveninagar Slum Dwellers Resettled, Problems Remain; 3,000 Residents Affected

Web Summary : Triveninagar slum residents resettled into buildings face basic amenity shortages. Poor construction leads to water leaks and safety concerns. Lack of proper sanitation, inadequate water supply, and dysfunctional sewage treatment plague residents. Anganwadi lacks proper facilities, impacting children.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र