पिंपरी : भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. या मागणीचे निवेदन पिंपरीतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. २२ ऑगस्ट ) पोलिसांना दिले. राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील पिंपरी-चिंचवड शहरातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. गुन्हे मागे घेण्याविषयी शासन स्तरावर अंतिम कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे अटक सत्र त्वरीत थांबवावे अशीही मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना देण्यात आले आहे. सुरेश निकाळजे, धम्मराज साळवे, अर्चना गायकवाड, संगिता शहा, अमोल उबाळे, भारत मिरपगारे आणि अजय लोंडे यांच्या शिष्ट मंडळाने पोलिसांना निवेदन दिले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:59 IST