शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल

By नारायण बडगुजर | Updated: September 12, 2022 14:51 IST

दोन्ही गाड्यांना डबे पूर्ववत करण्याची मागणी

पिंपरी : मध्य रेल्वेच्या मुंबई - पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस या गाड्या मुंबई - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवन वाहिन्या आहेत. मात्र या गाड्यांच्या जनरल बोगी कमी केल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. 

रेल्वे प्रवाशी सघटना पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना याबाबत निवेदन दिले आहे. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस एलएचबी कोचसह नव्या स्वरुपात सुरू केल्या आहेत. मात्र, या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीनला एकच जनरल डबा असल्यामुळे, या डब्यामध्ये उभे रहाणेही मुश्कील होते. त्यामुळे तिकीटधारकांना आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरक्षित तिकीटधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यातून प्रवाशांमध्ये वाद होतात. सिंहगड एक्सप्रेस मार्च, २०२० पर्यंत १९ डब्यांची होती. त्यानंतर २१ मार्च २०२२ पर्यंत १६ डब्यांची होती. सध्याची ही गाडी १४ डब्यांची असून दोन जनरल डबे कमी केले आहेत. डेक्कन क्वीन एक्सप्रेसची एक जनरल बोगी कमी केली आहे. या दोन्ही गाड्या प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांना जनरल डबे (बोगी) कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीटधारकांचा प्रवास अतिशय त्रासदायक होत आहे. ते टाळण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला एक जनरल डबा आणि सिंहगड एक्सप्रेसला दोन जनरल डबे जोडावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीticketतिकिटSocialसामाजिक