शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:01 IST

६६ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागी वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून, येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने उपचारामध्ये अडथळे येतात. त्यामुळे रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मेडिसीन विभागामध्ये १२, स्त्रीरोग ८, न्यूरोसर्जरी २, डायलिसीस २, बालरोग आयसीयू ३, इमर्जन्सी वॉर्ड २, आयसीयू १८, उरोरोग २, क्ष किरण कक्ष ४, दंतरोग ३ असे ५६ कनिष्ठ निवासी डॉक्टर भरण्यात येणार आहे. तर सीएमओ विभागात ५, शवविच्छेदन ३ आणि रक्तपेढीमध्ये २ अशा १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यांना दरमहा ७५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.दरम्यान, अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही पातळीवर अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टर