पुरस्काराने मिळते, बळ अन् प्रेरणा
By Admin | Updated: January 5, 2016 02:16 IST2016-01-05T02:16:50+5:302016-01-05T02:16:50+5:30
सावित्रीबार्इंचे महान कार्य सर्वज्ञात आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्यामुळे स्त्रियांचे मनोधैर्य वाढते. पुरस्काराने बळ आणि प्रेरणा मिळते

पुरस्काराने मिळते, बळ अन् प्रेरणा
पिंपरी : सावित्रीबार्इंचे महान कार्य सर्वज्ञात आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्यामुळे स्त्रियांचे मनोधैर्य वाढते. पुरस्काराने बळ आणि प्रेरणा मिळते, असे उद्गार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.
महात्मा जोतिबा फुले मंडळातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण चिंचवडगाव येथील जिजाऊ क्रीडांगणावर रविवारी झाले. महिलांनी सावित्रीबार्इंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ‘मोरया मोरया’ या कलाविष्काराने कार्यक्रमास सुरुवात झाली. खासदार बारणे, अखिल भारतीय माळी समाज कार्यकर्ते आनंदा कुदळे, प्रबुद्ध महासंघाचे किशोर सोनवणे, जि.प. सदस्य चंद्रशेखर भोसले, टेल्को युनियनचे अध्यक्ष रमेश गारडे, गजेंद्र निंबाळकर, बाळासाहेब वाल्हेकर, महाराष्ट्र राज्य गुरव समाजाचे प्रताप गुरव, नगरसेविका अपर्णा डोके, आशा सूर्यवंशी, जयश्री गावडे, अश्विनी चिंचवडे, हर्षा भोईर उपस्थित होते.
आदर्श माता पुरस्कार सुभद्राबाई वाल्हेकर अनसूया जमदाडे, प्रभावती साळुंके, नर्मदाबाई भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. उद्योगभूषण पुरस्कार नर्मदाबाई भुजबळ, कर्तव्यभूषण विद्या भिलारकर, कलाभूषण गिरिजा प्रभू, स्मिता जोशी, आदर्श प्राध्यापिका अंजुम शेख, आदर्श शिक्षिका रूपाली जाधव, नम्रता तोडकर, सहकारभूषण सुनंदा वाघमारे, पत्रकारभूषण सुवर्णा नवले, महिला कामगारभूषण कल्पना भाईगडे, समाजभूषण रंजना जोशी, शीला गिते, रंजना साळवी, क्रीडाभूषण माही मौलवी, कांचन देशपांडे, महिला सक्षमीकरण रश्मी झगडे यांना पुरस्कार देण्यात आले.
अध्यक्ष हनुमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा चव्हाण व शोभा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नरहरी शेवते, श्रीधर बाळसराफ, राजेंद्र बरके, सुरेश फुलसुंदर,
जतीन क्षीरसागर, नीलेश
डोके, सोमनाथ शिरसकट, लक्ष्मण राऊत, श्रीहर हराळे यांनी संयोजन केले. महादेव भुजबळ यांनी
आभार मानले. (प्रतिनिधी)