शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रावेत बंधारा ड्रोन सर्वेक्षणाचे पाच लाखांचे काम निविदेविना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 1:58 AM

रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे.

पिंपरी  - रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार असून, ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून, साडेपाच लाख रुपये खर्च केला जाणार आहे.पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणीवापर, तसेच भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन बांधला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकांत महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्यावाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधाºयाजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. रावेत येथील बंधाºयातून महापालिका ४८० एमएलडी, एमआयडीसी १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० एमएलडी उपसा करते. बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधाºयाची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येते. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने साठवणूक क्षमता कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांची बैठक झाली. रावेत बंधाºयाच्या वरील बाजूस नदीपात्रासमोर ही योजना आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी या बैठकीत सांगितले. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे केले जाणार आहे. या सर्वेक्षणात बंधाºयाची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे.पाणीपुरवठा विभाग : उधळपट्टीकडे दुर्लक्षनिविदा न काढता सर्वांत कमी दर सादर केलेल्या ठेकेदाराला काम देण्याचे ठरविले असून, त्यानुसार ५ लाख ५० हजार रुपये हा लघुतम दर सादर करणाºया राहुल देशमुख यांना निविदा न मागविता करारनामा करून थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. अंदाजपत्रकातील ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशीर्षांतर्गत रावेत येथील जुन्या बंधाºयाच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे या कामांतर्गत पाच लाख खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड