पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:46 IST2017-12-09T14:42:54+5:302017-12-09T14:46:03+5:30
तीन वर्षाच्या बालिकेवर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार; आरोपी अटकेत
पिंपरी : तीन वर्षाच्या बालिकेवर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवप्रसाद यादव (वय १८, रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी उत्तरप्रदेश मधील एका गावातील रहिवासी आहेत. मुलीच्या वडिलांनीच आरोपीला पुण्यात कामासाठी आणले होते. आरोपी भंगार गोळा करायचे काम करतो. मुलीच्या गुरुवारी सायंकाळी त्याने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने मुलीला नेले तिच्यावर अत्याचार केला.
घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पिंपरी चिंचवडमधील एकाच आठवड्यात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.