पुणो : वीस वर्षीय युवतीला लगAाचे आमिष दाखवून बलात्काराच्या प्रकारानंतर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीला 15 जुलैर्पयत पोलीस कोठडीचा आदेश दिला.
नवीन युवराजसिंग राजपूत (रा. 123/3 क्रॉस प्रेस्टीज वेलिंग्टन पार्क, बंगळुरू) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मार्च 2क्14 ते 1क् जुलै या काळात घडली. नवीनने या युवतीला लगAाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याबाबत कोणाजवळ काही बोलल्यास फिर्यादीचे आई, वडील व दोन लहान भाऊ यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, युवतीच्या वडिलांच्या नावावर असलेले सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाचे दोन चेक चोरून नेऊन परस्पर ज्वेलर्सच्या दुकानात सोनेखरेदीसाठी तारण दिले होते. (प्रतिनिधी)