शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! लेक्चरर महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; गोळ्या खायला लावून गर्भपातही घडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 19:35 IST

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : लेक्चरर महिलेवर एका पोलिसाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी, साखरेवस्ती आणि हिंजवडी फेज एक येथे ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

आकाश प्रकाश पांढरे (वय ३०, रा. रावेत), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित २८ वर्षीय लेक्चरर महिलेने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी असलेला आकाश पांढरे हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्त आहे. फिर्यादी पीडित महिला ही लेक्चरर म्हणून नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवते. फिर्यादी महिला तिच्या मुलीसोबत राहते. ती एकटी असल्याचा पांढरे याने गैरफायदा घेतला. आकाश पांढरे याने तो पोलीस असल्याचे पीडित महिलेला सांगितले. तू एकटी कशी राहतेस बघतो, असे म्हणून फिर्यादी महिलेला धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसोबत वारंवार जबरदस्ती शारीरिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यापासून फिर्यादी महिला गरोदर राहिली. त्यानंतर आकाश पांढरे याने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकdocterडॉक्टर