Corona Vaccine in Pimpari: लसीचा साठा संपला; पिंपरीतील लसीकरण केंद्र बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:10 IST2021-04-08T23:10:47+5:302021-04-08T23:10:58+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आले आहे.

Corona Vaccine in Pimpari: लसीचा साठा संपला; पिंपरीतील लसीकरण केंद्र बंद राहणार
पिंपरी: महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वीत करण्यात आली आहेत. लसीचा साठा उपलब्ध नसल्याने दि. ९ एप्रिल रोजी सदर सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आले आहे. तर खाजगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे, शहरातील एकुण २ लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असून साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत वेळेत सुरू करण्यात येणार आहेत, असे साळवे यांनी सांगितले.