सोमाटणे परिसरातील लॉजवर छापा, सहा महिलांची सुटका; वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक
By प्रकाश गायकर | Updated: March 8, 2024 18:05 IST2024-03-08T18:04:31+5:302024-03-08T18:05:01+5:30
ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये करण्यात आली.....

सोमाटणे परिसरातील लॉजवर छापा, सहा महिलांची सुटका; वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक
पिंपरी : महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये करण्यात आली.
राहुल शिवाजी शिंदे (वय ३१, रा. धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश कारोटे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये बुधवारी रात्री छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये सहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर आरोपी राहुल हा आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.