शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राडा, भाजपातील भोसरी विरूद्ध चिंचवड गटबाजी चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 20:01 IST

सभागृहातील माईक, फोन, खुर्च्या आदी साहित्याची फोडतोड

ठळक मुद्देशिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या वाकड प्रभागातील रस्ते विकासकामांवरून भाजपात धुसफूस

पिंपरी : वाकडच्या विकासकामांवरून स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेत भाजपातील गटबाजी समोर आली असून भोसरी विरूद्ध चिंचवड असे चित्र दिसून आले. अध्यक्ष संतोष लोंढे यांनी आयुक्तांना खुलासा करून न दिल्याने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सहा सदस्यांनी गोंधळ, राडा घातला. सभागृहातील माईक, फोन, खुर्च्या आदी साहित्याची फोडतोड केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपातील सदस्यांमध्ये जुंपली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या वाकड प्रभागातील रस्ते विकासकामांवरून भाजपात धुसफूस सुरू आहे. राज्य शासनाने या विषयांसंदर्भात निर्णय दिल्याने, तसेच भाजपातील भोसरीच्या गटाने रस्ते विकासाला पाठबळ दिल्याने चिंचवड विरूद्ध भोसरी असा संघर्ष सुरू झाला आहे.

स्थायी समितीची सभा दुपारी अडीचला सुरू झाली. सभेत जगताप गटाचे समर्थक अंबर कांबळे, झामा बारणे, शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, आरती चोंधे हे सदस्य आक्रमक झाले. वाकड येथील मंजूर रस्ते विकासकामांच्या प्रश्नांवर आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी अध्यक्षांकडे केली. त्यावर आठवड्या भरात आयुक्त खुलासा करतील. अशी भूमिका लोंढे यांनी मांडली. त्यावरून चिंचवडचे नगरसेवक आक्रमक झाले. आत्ताच खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिंचवडचे सदस्य कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याचवेळी सभेचे कामकाज सुरू केल्याने चिडलेल्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्याचवेळी शांत रहा, अशी भूमिका भोसरी विधानसभेतील भाजपाच्या सदस्यांनी घेतली. मात्र, चिडलेले सदस्यांनी तोडफोड करायला सुरूवात केली. आयुक्त आणि नगरसचिव यांच्या अंगावर धावून गेले. तसेच माईक, फोनची तोडफोड केली.  

         

 ..........अध्यक्षांनी बोलून दिले नाहीसभेनंतर भाजपात सभेतील गोंधळावरून मतभेद आढळून आले. चिंचवडमधील सहा सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. बनावट एफडीआर प्रकरणी आयुक्तांनी उत्तर न दिल्याने वाद झाल्याचे सांगितले. अध्यक्षांनी आयुक्तांना खुलासा करून देण्याची सूचना केली नाही. अध्यक्षांनी बोलून दिले नाही, त्यामुळे निषेध केला.............सभेत झालेला वाद हा वाकडच्या विषयांवरून होता. एफडीआरवरून नव्हता. आयुक्तांनी मत मांडण्यासाठी आठवड्याची मुदत मागितली होती. त्यानुसार सदस्यांना सांगितले. मात्र, त्यांचे समाधान झाले नाही. गेले अनेक महिने कामकाज बंद होते. त्यामुळे महत्वाचे विषय असल्याने सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले.-संतोष लोंढे, अध्यक्ष स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना