शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पिंपरी चिंचवड महापालिकेत पाण्यावरून रणकंदन, प्रशासनाच्या कारभारावर उपमहापौर संतप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:37 PM

पवना धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुबलक पाणी असूनही शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याविषयी बैठक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रास पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुबलक पाणी असूनही शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे. पवना धरण भरले असतानाही पाणीप्रश्न गंभीर झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन अशी बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने अपुरी माहिती दिल्याने उपमहापौर तुषार हिंगे बैठकीतून निघून गेले. पाणीपुरवठा विभाग नागरिकांच्या भावनांशी खेळत असल्याची टीका केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याविषयी बैठक झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य अभिषेक बारणे, तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही?बैठकीत पाणीपुरवठाविषयक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. तसेच उपमहापौरांनी तर १५ प्रश्न विचारले होते. शहरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे, त्याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे....................उपमहापौरांनी व्यक्त केला रागप्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी प्रक्रिया न करताच नागरिकांना पुरविले जात आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार उपमहापौरांनी केली. त्यावर याबाबत काही माहिती असल्यास प्रशासनास द्यावी, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यावेळी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनीही पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. प्रशासनास समाधानकारक उत्तर देता आले नाही, ही बाब चुकीची आहे. नागरिकांच्या आरोग्याशी पाणीपुरवठा विभागाने खेळू नये, असे चिडून उपमहापौरांनी सभात्याग केला.....................................बैठकीत ऐनवेळी सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. तक्रारीबाबतची माहिती त्यावेळी माझ्याकडे उपलब्ध नव्हती. पाण्यासंदर्भात सर्वसाधारण जी माहिती उपलब्ध होती ती मी सांगितली. त्यामुळे कनिष्ठ सहाकाऱ्यांशी बोलून, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन पुढील बैठकीत सादर करण्यात येईल.-रामदास तांबे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीMayorमहापौर