दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

By Admin | Updated: June 18, 2014 00:09 IST2014-06-18T00:09:35+5:302014-06-18T00:09:35+5:30

पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले

Puravar taluka in tenth district district first | दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

जेजुरी : पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. ६२ पैकी ३३ विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९७.४५ पुरंदरचा आहे.
इतरा शाळांचा निकाल पुढील प्रमाणे : पुरंदर हायस्कूल सासवड ९७.७६, शंकरराव ढोणे विद्यालय गराडे ९५.५०, श्री शिवाजी विद्यामंदिर आंबळे ९३.७५, रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर ८९.६५, म. फुले विद्यालय शिवरी ९६.७३, कृषी औद्योगिक विद्यालय चिंबळी ९८.९०, श्री कातोबा हायस्कूल दिवे ९२.७७, डॉ. शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे ९३.१८, लिलावती रिखवलाल शहा विद्यालय नीरा ९०.२९ टक्के, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे ९७.६७, भुलेश्वर विद्यालय माळशिरस ९५ टक्के, सिद्धेश्वर विद्यालय नायगाव ९६.५५ टक्के, महर्षी वाल्मीकी विद्यालय कोळविहिरे ९८.५२, महर्षी वाल्मीकी विद्यालय वाल्हे ९४.१३, कन्या प्रशाला सासवड ९६ टक्के, माध्यमिक विद्यालय मांढर ९४.४४, श्री केदारेश्वर विद्यालय काळदरी ९७.५०, श्री नागेश्वर विद्यालय नाझरे क.प. ९२.५९, माध्यमिक विद्यालय यादववाडी ९७.०५, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर ९० टक्के दहावीच्या निकालात पुरंदर माध्यमिक शिक्षक नेते कुंडलिक मेमाने, प्राचार्य नंदकुमार सागर, वसंतराव ताकवले, सुधाकर जगदाळे, शिवाजीराव कोलते, नितीन राऊत, तानाजी झेंडे, बाळासाहेब कुमाडे, अशोक टाकळे यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले. (वार्ताहर)

Web Title: Puravar taluka in tenth district district first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.