शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड रेल्वेस्थानकाजवळचा पूल पाडून नवीन उभारणार;वाहनचालकांसाठी प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:58 IST

- मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता.

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यास मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालांवर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे जुना पूल पाडून नवीन पूल उभारल्याने येथील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाच्या उजव्या बाजूला समांतर उड्डाणपूल २००४ मध्ये बांधण्यात आला आहे. तर, १९७६ मध्ये बांधण्यात आलेला जुना पूल स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कमकुवत असल्याचे आढळून आले. या ऑडिटच्या अहवालानंतर महापालिकेने जुन्या पुलावर हलकी वाहने आणि दुचाकी वगळता इतर वाहनांना जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे येथून जाणारी जड वाहने आणि बसेस यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर, संबंधित पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेद्वारे विविध संस्थांकडून तांत्रिक आढावा घेण्यात आला. २०२१ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आणि २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या पुनर्विलोकनानुसार जुना पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर रेल्वे विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी आणि नवीन पुलाच्या आधुनिक पुनर्बांधणीसाठी संमती दिली. यासंबंधी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला ४ मार्च रोजी कार्यादेश देण्यात आला. त्यामुळे आता लवकरच येथील जुना पूल पाडून नवीन पूल उभारला जाणार आहे.

चिंचवड स्टेशनजवळील जुन्या उड्डाणपुलाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तज्ज्ञांच्या मूल्यांकनातून आणि नागरिकांचा अभिप्राय लक्षात घेऊन येथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाची यासाठी मंजुरी मिळाली असून येथे नवीन पूल उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.  – शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड