शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

मावळात ‘सैराट’..! नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा रागातून दिली खुनाची सुपारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:56 IST

गुंडाविरोधी पथकाने तिघांना केले जेरबंद; रायगड व साताऱ्यातून संशयित ताब्यात 

पिंपरी : नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा खून करण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेल्या या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. अभिजीत संतोष केदारी (वय २६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२, दोघेही रा. ताजे, ता. मावळ) आणि आकाश अण्णा भोकसे (२६, रा. कुरकुंडी, ता. खेड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी किरण बाळासाहेब केदारी (वय ३३, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) रात्री साडदेहाच्या सुमारास ही घटना घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादीचा भाऊ विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे) याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर पिस्तूलसारख्या हत्याराने गोळी मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीला संशय आहे की, विकास याचे संशयित अभिजित याच्या नातेवाईक तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या कारणामुळे संशयितांनी हा हल्ला केला.   

दरम्यान, घटनेनंतर संशयित पसार झाले. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथक करत होते. पथकाने संशयितांचा माग काढला. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक समीर लोंढे यांना संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना ताब्यात घेतले. यात संशयित अभिजित केदारी याला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून तर नितीन केदारी याला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेतले. तिघा संशयितांपैकी नितीन केदारी आणि आकाश भोकसे यांच्यावर पूर्वीपासून खून आणि शस्त्रप्रकरणी गंभीर गुन्हे नोंद आहेत. नितीन केदारीवर कामशेत पोलिस ठाण्यात भादंवी कलम ३०२ अंतर्गत तर आकाश भोकसेवर चाकण (ट्रिपल मर्डर प्रकरण) आणि ओशिवारा पोलिस ठाण्यातील शस्त्रप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maval: 'Sairat' like murder plot over interfaith love affair.

Web Summary : A shocking murder plot, reminiscent of 'Sairat,' unfolded in Maval due to a love affair. Three arrested for contracting the murder of a young man involved with a relative's daughter. Accused have prior criminal records, including murder.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी