शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

MHADA Lottery 2025: म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:52 IST

Pune and Pimpri-Chinchwad MHADA Lottery 2025: - नियमांचे उल्लंघन केल्यास म्हाडा गुन्हे दाखल करणार : शिवाजीराव आढळराव पाटील  

पिंपरी :  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण पुणे (म्हाडा) वतीने येत्या पंधरा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर चाकण आणि नेरे परिसरामध्ये नवीन प्रकल्प उभारण्याची उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती म्हाडाचे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी- चिंचवड आढळराव पाटील आले असताना पत्रकारांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले, म्हाडाच्या पुणे महामंडळाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. महामंडळाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये आत्तापर्यंत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या आहेत.  येत्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे साडेचार हजार घरांची सोडत निघणार आहे.'   संत तुकारामनगर येथील जुन्या गाळ्यांचे पुनर्विकास प्रक्रिया सुरूआढळराव पाटील म्हणाले, म्हाडाच्या वतीने स्वतंत्र प्रकल्प उभारण्याबरोबरच खाजगी विकसकांच्या माध्यमातूनही प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात म्हाडाची भूमिका महत्त्वाची आहे. संत तुकारामनगर येथील सुमारे एक हजार गाळ्यांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया तेथील गाळेधारक एकत्र येऊन खाजगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प राबवू शकतात. त्या प्रकल्पाला ना हरकत देण्याचे काम म्हाडा करीत आहे.'    चाकण आणि नेरे येथे नव्याने प्रकल्पांचे नियोजनशहराचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे त्या- त्या भागांमध्ये प्रकल्प उभारण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. म्हाडाच्या वतीने चाकण आणि पिंपरी- चिंचवड शहरालगतच्या भागांमध्ये असणाऱ्या चाकण आणि नेरे परिसरामध्ये असणाऱ्या म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू आहे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.    विकासाकांवर गुन्हे दाखल ''खाजगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प उभारून त्यामध्ये म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थ्यांना घरे दिली जातात. याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही तातडीने त्या ठिकाणी पाहणी करतो. म्हाडासाठी घरे देताना जे निकष आहेत, त्या निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. या संदर्भातील तक्रारी मंडळाकडे आल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन केले असल्यास गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही विकासकांवर गुन्हे दाखल केले आहेत, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड