पिंपरी : गॅस टंचाईमुळे वाढत्या महागाईच्या झळा आता बेकरी उद्योगालाही असह्य होऊ लागल्या आहेत. एकेकाळी गोड सुगंधाने भरलेले बेकरीचे वातावरण सध्या चिंतेच्या छायेत आहे. त्यामुळे बेकरी चालकांनी उत्पादनांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात असून सोमवार (दि.३०) पासून ब्रेड, बिस्किटे, केक यांसारख्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे.
बेकरी उत्पादक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सईदुद्दिन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अन्सारी म्हणाले की, गॅस सिलिंडरअभावी परिस्थिती बिकट झाली आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के बेकऱ्या बंद पडल्या आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह थांबला असून उरलेल्या ३० टक्के बेकऱ्या कसाबसा व्यवसाय टिकवून आहेत. डिझेल, पेट्रोल, पॅकेजिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरांनी या व्यवसायाचा गळा आवळला आहे.
बेकरी हा केवळ आमचा व्यवसाय नाही, आमचे आयुष्य आहे; पण आज मजुरांची कमतरता, इंधन दरवाढ आणि वाढता खर्च यामुळे हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. इच्छा नसतानाही आम्हाला दरवाढ करावी लागत आहे. तरीही आम्ही ती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू. मात्र, दरवाढीनंतर ग्राहकांनी बेकरी चालकांशी वाद घालू नका. या कठीण काळात सर्वांनी समजून घ्यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
----------
बेकरी उत्पादनांचे जुने व नवे दर
लादी पाव (९ लादी ६ पाव) -१५, २०
लादी पाव (९ लादी ८ पाव) -१८, २५
खारी (१ किलो) -२००, २४०
टोस्ट (१ किलो) -२००, २४०
ब्रुन (१ नग) -७, १०
लादी १ पत्रा (लाट)- ६०, ८०
Web Summary : Rising gas prices and material costs force Pimpri bakeries to increase prices. Many bakeries closed, survivors struggle with fuel and labor costs, appealing for customer understanding amid price hikes.
Web Summary : बढ़ती गैस की कीमतें और सामग्री लागतें पिंपरी बेकरियों को कीमतें बढ़ाने के लिए मजबूर करती हैं। कई बेकरियां बंद, बचे हुए ईंधन और श्रम लागतों से जूझ रहे हैं, मूल्य वृद्धि के बीच ग्राहकों से समझ की अपील।