शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा संशयित अटकेत;दिल्ली येथे वाकड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:58 IST

- मॅट्रिमोनियल वेबसाईटवर खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेची फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयिताला वाकड पोलिसांनी अटक केली. दिल्‍ली येथून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन ही कारवाई केली.

आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. शास्त्रीनगर, जयपूर) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. संशयिताने विविध विवाह वेबसाईटवर खोट्या ओळखीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे.

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २७ सप्टेंबर २०२५ रोजी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आलोक पुरोहित याने जीवनसाथी डाॅट काॅम, शादी डाॅट काॅम आणि आयआटीएमशादी डाॅट काॅम या विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत पुण्यात येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. यानंतर संशयिताने फिर्यादीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमक्या देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “तक्रार केल्यास फोटो सोशल मीडियावर प्रसारित करीन,” अशी धमकी देत संशयिताने तिचा मानसिक छळ केला होता. 

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्पर कारवाई करत दिल्ली येथून पुरोहित याला ताब्यात घेऊन ७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यास अटक केली.

तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहित असल्याचे समोर आले असून, तो विविध मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीच्या आधारे महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर महिलांनाही संशयिताने अशाच प्रकारे फसविल्याचे समोर आले आहे.   पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, तसेच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.   

पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसऱ्या पत्नीलाही फसविले

संशयित पुरोहित हा विविध कंपन्या व आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम करतो. त्याचे मुंबई येथे एक कार्यालय असल्याचेही समोर आले आहे. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर दुसरे लग्न केले. मात्र, त्यानंतरही त्याने विविध संकेतस्थळांवर नाव नोंदणी करून अनेक महिलांची फसवणूक केली. याबाबत त्याच्या दुसर्‍या पत्नीला माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

उच्चशिक्षित महिलांची फसवणूक

संशयित पुरोहित याची पहिली आणि दुसरी पत्नीही खासगी कंपनीत उच्चपदावर नोकरी करतात. तसेच विविध संकेतस्थळांवरून उच्चशिक्षित महिलांशी संपर्क साधून त्यांना लग्नाचे आमिष देतो आणि त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संशयित पुरोहित याला बेड्या ठोकल्या असून फसवणूक झालेल्या महिलांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र