पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:02 PM2019-08-13T13:02:45+5:302019-08-13T13:05:43+5:30

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत.

publicity stunt by flood related help in Pimpri: The fight to get credit | पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ

पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ

Next
ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदत देताना घ्यावी काळजी, प्रशासनाचे आवाहन पूरग्रस्तांना मदत करावी या भावनेने शहरी भागातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकारसोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध राजकीय नेत्यांचा पुढाकार

पूरग्रस्तांना मदत देताना घ्यावी काळजी, प्रशासनाचे आवाहन 
पिंपरी : पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली संधीसाधू चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करीत असून, पूरग्रस्तांचे नाव करून भावनेच्या भरात आपली फसवणूक होऊ शकते, त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करताना जागरूक रहाणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध घेतली जात आहे. पूरग्रस्तांचे नाव पुढे करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे सावधान...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने निवारा कॅम्प निर्माण केले आहेत. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने तर कोल्हापूरमध्ये हेलिकॉप्टरने वस्तू पाठविल्या जात आहेत. 
पूरग्रस्तांना मदत करावी या भावनेने शहरी भागातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, मदत कशी आणि कोणाकडे करावी याबाबत माहिती नसल्याने नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मदत सामान्यांची, 
चमकोगिरी नेत्यांची 
पूरग्रस्तांना मदत करावी, असे फलक विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शहरात लावले आहेत. नागरिकांकडून मदत घेऊन त्यावर चमकोगिरी करण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या मदतीवर राजकीय नेते भाव खात आहेत. फोटोसेशन करीत आहेत.   तसेच सोशल मीडियावर व्हायरल करुन श्रेय लुटण्याचे काम केले जात आहे.
.......
पूरग्रस्तांसाठी विविध संस्था, संघटनांच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे. हे माणुसकीचे, मानवतेचे उत्तम लक्षण आहे. पूरग्रस्तांना मदत देताना आपण कोणाकडे आणि कोणत्या संस्थेकडे देतोय याबाबत सजग असणे गरजेचे आहे. तसेच आर्थिक स्वरूपाची मदत मुख्यमंत्री साहायता निधीस थेट देता येणार आहे. तसेच वस्तू स्वरुपातील मदत विभागीय आयुक्त कार्यालयात देता येणार आहे. मदत गरजूपर्यंत पोहोचविली गेली तरच मदतीचा हेतू साध्य होईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
.......पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाºया नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने मदत कक्ष निर्माण केला आहे. त्यामध्ये वस्तू स्वरुपातील मदत जमा करता येणार आहे. 2नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करावयाची असल्यास ही मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करता येणार आहे. अन्य कोणाकडेही मदत देऊ नये. 3विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरूपात मदत जमा करता येणार आहे. यात ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साड्या, टॉवेल सॅनिटीरी नॅपकिन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बमुर्डा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे पोशाख स्वीकारले जाणार आहेत. नवीन कपडे स्वीकारली जातील. 4जुने कपडे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडिक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. साखर, मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा मालही स्वीकारण्यात येणार आहे.

........
राजकीय नेत्यांचा पुढाकार
विविध संस्था आणि राजकीय नेत्यांनी स्वत:चे फोटो असणारे फ्लेक्स वेगवेगळ्या चौकांत लावले आहेत. ‘यांच्या पुढाकारातून... मदत निधी’ असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने इच्छुकांचीही चमकोगिरी सुरू आहे. सोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध घेतली जात आहे. तसेच काही महाभागांनी आपले स्वत:चे बँक खाते क्रमांकही दिले आहेत. त्यामुळे मदत करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपण कोणत्या संस्थेला मदत करतो आहे, त्या संस्थेची विश्वासार्हता पाहणेही गरजेचे आहे. 
......
रोख स्वरूपात रक्कम गोळा करण्याचे प्रकार सुरू
 
विविध सोसायट्या, गृहनिर्माण संस्था, विविध संघटनांच्या वतीने रोख स्वरूपात रक्कम गोळा केली जात आहे. ही रक्कम कोणाकडे आणि कशी देणार? याबाबत देणगी आणि मदत देणाºयांना माहिती घेणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेला रोख रक्कम देण्याऐवजी मुख्यमंत्री कार्यालयाने निर्माण केलेल्या मुख्यमंत्री साहायता निधीच्या नावाने धनादेश देणे गरजेचे आहे. रोख रक्कम देताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: publicity stunt by flood related help in Pimpri: The fight to get credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.