आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावरील सार्वजनिक वाचनालय आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:28 IST2017-12-27T16:47:21+5:302017-12-27T17:28:15+5:30
आकुर्डी-चिंचवडगाव रोडवर इंदिरानगर परिसरात पादचारी मार्गावर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाला सव्वाचार वाजता अचानक आग लागली.

आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावरील सार्वजनिक वाचनालय आगीत खाक
चिंचवड : आकुर्डी-चिंचवडगाव रोडवर इंदिरानगर परिसरात पादचारी मार्गावर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाला आज (बुधवार, दि. २७) सायंकाळी सव्वाचार दरम्यान अचानक आग लागली. यामुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते.
महापालिकेच्या प्राधिकरणमधील अग्निशामक दलाचे जवान पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत आग विजवली. तत्पूर्वी वाचनालयाचा बहुतांश भाग जळून खाक झाला होता.
या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. धुराचे लोट पसरल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ या भागात वाहतूककोंडीही झाली होती. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.
चिंचवड परिसरात अनेकदा आगीच्या घटना घडतात. मात्र परिसरात अग्निशामक दलाच्या गाड्या नसल्याने अडचणी येत आहेत. आज आगीची घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावर दोन नामांकित कंपन्या आहेत. घटनास्थळावर आग विझविण्यासाठी या कंपन्यांचे सहकार्य मिळणे अपेक्षीत होते. मात्र या घटनेकडे कंपनी व्यवस्थापनाचे कोणीही फिरकले नाही.