बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात आग; २० हेक्टर वनसंपदा जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 07:34 PM2017-12-26T19:34:55+5:302017-12-26T19:38:07+5:30

बुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.

Buldhana: Fire in Dnyan Ganga Wildlife Sanctuary 20 hectares burnt in forests | बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात आग; २० हेक्टर वनसंपदा जळून खाक!

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात आग; २० हेक्टर वनसंपदा जळून खाक!

Next
ठळक मुद्दे२५ डिसेंबरला रात्री बुलडाणा रेंजमधील कक्ष क्र. २७६ च्या भागात लागली होती आग फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने प्राधान्याने हाती घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानगंगा अभयारण्यात आग लागण्याच्या घटनांना प्रारंभ झाला असून फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने आता प्राधान्याने हाती घेणे गरजेचे झाले आहे. 
वनविभागाला तीन गवत कापणी यंत्रही नुकतेच मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वी केवळ मनुष्य बळावर होणारी फायर लाईनची कामे आता यंत्राद्वारेही करणे शक्य होणार आहे. प्रकरणी वन्यजीव विभागाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सोमवारी सायंकाळी लागलेली ही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. प्रामुख्याने बुलडाणा रेंजमधील कक्ष क्रम २७६ च्या भागात ही आग लागली होती. या आगीमध्ये जवळपास २० हेक्टर वनसंपदा नष्ट झाल्याचा दावा सुत्र करती असली तरी आरएफोंच्या म्हणण्यानुसार आठ ते दहा हेक्टर क्षेत्र या आगीत नष्ठ झाल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे नेमके किती क्षेत्र या आगीत नष्ट झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने ज्ञानगंगा अभयारण्यातील रेंज कक्ष क्रमांक २७६ कडे रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोवर आगीच्या भक्ष्यस्थानी मोठ्या प्रमाणावर वनसंपदा गेली होती. बुलडाणा, मोताळा, चिखली आणि खामगाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागात हे ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे. शेड्यूल एचमध्ये असलेल्या बिबट्यांसह राज्यात अस्वलांच्यासाठी प्रामुख्याने हे अभयारण्य ओळखले जाते. तेलीणीची गुहा ही वन पर्यटनासाठी एक चांगले स्थळ या अभयारण्यात आहे. दरम्यान, अमरावतीचे सीसीएफ एम. एस. रेड्डी यांच्या विशेष प्रयत्नामुळे पाळीव गुरे चारणार्यांना अभयारण्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याची कठोरपणे अंलबजावणी होत आहे. त्यामुळे त्यामुळे जंगलामध्ये यावर्षी गवताचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पवन्या गवत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आले असून गुरांसह हरीण, काळवीट हे गवत प्रामुख्याने खातात. -- फायर ब्लोअर घटनास्थळी-- आगीची सुचना मिळताच वनविभागाचे फायर ब्लोर रवाना करण्यात आले होते. मात्र रात्रीची वेळ आणि वारे यामुळे आगीची व्याप्ती वाढ गेली. त्यामुळे मोठ्या कष्टानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आल्याचे काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. तोवर जवळपास २० हेक्टर क्षेत्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. -- आठ ते १० हेक्टरचे नुकसान-- अभयारण्यातील ज्या भागाला आग लागली त्या भागात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जवळपास आठ ते दहा हेक्टरवरील वनसंपदेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच फायर ब्लोर घटनास्थळी रवाना केले होते. (बी. आर. पवार, आरएफओ, ज्ञानगंगा अभयारण्य (वन्यजीव)) --सतर्कतेची गरज-- अभयारण्यात पाळीव गुरांना यावर्षी पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने अभयारण्यात पवण्या गवतासह अन्य गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे वनविभागाने फायर लाईनची कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेही सतर्क असणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Buldhana: Fire in Dnyan Ganga Wildlife Sanctuary 20 hectares burnt in forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.