शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:02 IST

शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत

पिंपरी : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अक्षभ्य आणि निंदनीय वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा निषेध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. खरे तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रमाणे अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. काही शेतकऱ्यांना तर ती मिळतच नाही. त्यातही पीक विम्याची रक्कम महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या रकमेतून दिले जाते. मंत्र्यांच्या खिश्यातून दिली जात नाही. त्यामुळे मंत्र्यांनी अहंकारात राहून ते बेताल वक्तव्य करु नये.

हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, पण सरकारने एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे वादग्रस्त विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तसेच शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

माणिकराव कोकाटे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. त्यांच्या मते, सरकारने शेतकऱ्यांना नाममात्र दरात पीक विमा उपलब्ध करून दिला असला, तरी त्याची उपयुक्तता आणि त्यातील त्रुटी यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, त्यांच्या या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिले.  

वादग्रस्त विधानावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले,"माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आखण्याचा माझा हेतू होता. एका रुपयात विमा देणे हे चांगले पाऊल आहे, पण त्याची कार्यवाही योग्य प्रकारे व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे," असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.  

विरोधी पक्षांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याऐवजी त्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला आहे. शेतकरी संघटनांनीही या वक्तव्याचा निषेध करत कृषिमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र