Pimpri Chinchwad: दलाल महिलेकडून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांची मारुंजीत कारवाई

By नारायण बडगुजर | Published: April 3, 2024 05:22 PM2024-04-03T17:22:50+5:302024-04-03T17:23:18+5:30

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅटमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली...

Prostitution business by broker woman in her own home, police crackdown | Pimpri Chinchwad: दलाल महिलेकडून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांची मारुंजीत कारवाई

Pimpri Chinchwad: दलाल महिलेकडून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय, पोलिसांची मारुंजीत कारवाई

पिंपरी : महिलेने पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात इतर महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दलाल महिलेला अटक केली. तसेच तिच्या ताब्यातील दोन महिलांची सुटका केली. मारुंजी येथे सोमवारी (दि. १) सायंकाळी ही कारवाई केली.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅटमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या फ्लॅटवर छापा मारला. दलाल महिलेच्या ताब्यातून दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Prostitution business by broker woman in her own home, police crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.