शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

शटरचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 19:55 IST

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून काळेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पिंपरी : ऑफिसच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ४० हजारांची रोकड असा एकूण सहा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काळेवाडी येथील विजयनगरमध्ये २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

आशिष सुदेश गुंजेकर (वय २७, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष गुंजेकर यांचे काळेवाडीतील विजयनगरमधील ॲपल प्रकृती बिल्डिंग येथे एस. एस. सिक्युरिटी सर्व्हिसेसचे ऑफिस आहे. हे ऑफिस बंद असताना चोरट्यांनी ऑफिसच्या शटरचे कुलूप तोडले. त्यानंतर ऑफिसमधील लाकडी कपाटातील ड्राॅवरमधून सोन्याचे दागिने आणि ४० हजारांची रोख रक्कम, असा सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.  

सीसीटीव्ही फुटेज

या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी कापडाने चेहरा लपवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे फवारला. त्यानंतर शटरचे कुलूप तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून ऐवज चोरून नेला. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून काळेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shutter Lock Broken, Six Lakhs Worth of Goods Stolen

Web Summary : Thieves broke into a shop in Kalewadi, stealing 11 tolas of gold and cash worth ₹6.15 lakhs. The incident occurred on November 28th. Police are investigating, reviewing CCTV footage where thieves concealed their faces.
टॅग्स :Robberyचोरी