शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर होतेय फक्त चर्चा, तोडगा मात्र काढलाच जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 03:25 IST

विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे जास्त ओझे विद्यार्थी वाहून नेत आहेत. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे.

चिंचवड : विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे जास्त ओझे विद्यार्थी वाहून नेत आहेत. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला आहे. दप्तराच्या वजनाबाबत वारंवार चर्चा होते. मात्र समस्यांवर तोडगा निघत नसल्याने अथवा शाळा प्रशासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी दप्तराच्या अधिक ओझामुळे त्रस्त झाले असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’ पाहणीत चिंचवडमधील काही इंग्रजी शाळेत आढावा घेतला असता, बहुतांशी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्यामुळे झुकल्याचे दिसून आले. दप्तरात वह्या, पुस्तके, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पाणी बाटली व डब्याचे ओझे घेऊन विद्यार्थी शाळेत येत आहेत. आठवड्यातून एकदा स्केटिंग अथवा कराटे या खेळाचे साहित्यही विद्यार्थी घेऊन येत असल्याचे पालक सांगत आहेत. याबाबत पालक व शाळा प्रशासनास गांभीर्य नसल्याने विद्यार्थी दप्तराच्या ओझामुळे त्रस्त आहेत.चिंचवडमधील काकडे पार्कमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार ते पाच किलो असल्याचे समोर आले. या विद्यार्थ्यांचे वजन बत्तीस किलो ते पस्तीस किलो होते. सरासरी विद्यार्थी दररोज साडेचार ते सहा किलो वजनाचे ओझे पाठीवर घेऊन शाळेत येत आहेत.विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची पाहणी होत नाही.मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर दप्तराच्या वाजनाबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा, असे धोरण आहे. दप्तराच्या ओझ्याबाबत संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्याचे व पाठदुखीचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्याचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती़ परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे पेलवत नाही. त्यामुळे पालकांनाच दप्तर घ्यावे लागत आहे. परंतु वर्गापर्यंत जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण