शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारांचा जाच, रिक्षाचालकाने उचललं टोकाचं पाऊल...! व्हिडिओ काढत सांगितली आपबीती…

By नारायण बडगुजर | Updated: January 4, 2025 20:51 IST

सावकारी जाचामुळे संपवले जीवन : महिलेसह चौघांवर गुन्‍हा दाखल

पिंपरी : व्याजाच्या पैशांसाठी मला धमक्या येत आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मला माफ करा... अशी पत्‍नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत एका रिक्षा चालकाने आपले जीवन संपविले. सावकारांच्‍या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. चिंचवड स्‍टेशन येथील साईबाबा नगरमध्‍ये शुक्रवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी संबंधित रिक्षा चालकाने व्हिडिओद्वारे आपली व्‍यथा मांडली असून सावकारांनी दिलेल्‍या त्रासाबाबत सांगितले आहे.  

राजू नारायण राजभर (४५, रा. साईबाबा नगर, चिंचवड स्‍टेशन) असे आत्‍महत्‍या केलेल्‍याचे नाव आहे. याबाबत त्‍यांचा मुलगा गणेश राजू राजभर (वय १९) यांनी शुक्रवारी (दि. ३) निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे (रा. घरकुल सोसायटी, चिखली), महादेव फुले (रा. आनंद नगर, चिंचवड स्टेशन), राजीवकुमार ऊर्फ गुड्डू भैया (रा. पिंपळे सौदागर), आणि संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्‍यांनी संशयितांकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करून देखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्‍या कारणावरून संशयितानी घरात घुसून तुला मारू, तुला कापून टाकू, अशा वारंवार धमक्या दिल्या. या धमक्‍यांमुळे राजू राजभर हे सतत तणावात होते. हा तणाव असह्य झाल्‍याने तसेच संशयितांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने राजू राजभर यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

आत्‍महत्‍येपूर्वी केला व्हिडिओ

राजू राजभर यांनी आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी एक व्‍हिडिओ तयार केला. आपण आत्‍महत्‍या का करीत आहोत, याबाबत राजू राभर यांनी व्हिडिओमधून सविस्‍तर सांगितले आहे. आत्‍महत्‍या करीत असल्‍याने आपली पत्‍नी, मुलगा व मुलीची त्यांनी व्हिडिओमधून माफीही मागितली आहे. तसेच दोन पानांची एक चिठ्‌ठीही लिहिली आहे. डोळ्यात अश्रू आणून आपली व्‍यथा मांडणाऱ्या राजू राजभर यांचा व्‍हिडिओ हृ्दय पिळवटून टाकणारा आहे. त्‍यांचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.सुसाईड नोट व्हायरल

राजू राजभर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात त्यांनी त्यांच्या छळाबाबत लिहिले आहे. सावकारांकडून सुरू असलेल्या  त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. या घटनेबाबत रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक