शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे

By विश्वास मोरे | Updated: May 9, 2024 08:43 IST

महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला...

पिंपरी : आपल्याकडे साधारणपणे भुताची भीती असते, भाजपाला पराभवाच्या भुताची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान गल्लीबोळात रोड शो करत आहेत. जनतेने आणले का नाही रस्त्यावर? शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे आसन जाळून भस्मसात करेल. महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला.

सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी खासदार संजय सिंह, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संघटक सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,  शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

हे  गजनी सरकार आहे! 

उद्धव ठाकरे यांनी तीस मिनिटांच्या भाषणामध्ये केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, 'भाजपसमोर या निवडणुकीत कोणतेच मुद्दे नाहीत. सन २०१४, २०१९ नंतर आता कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून हिंदू मुस्लिम केले जात आहे. मोदींचे करायचे काय? आता हे लोकच म्हणताहेत तडीपार! मी नाही. तुम्ही दहा वर्षात कमावले काय?  एके दिवशी पंतप्रधानांनी मध्यरात्रीपासून नोटबंदी केली. आता चार जूननंतर इंडिया आघाडी सत्तेत येईल आणि महाराष्ट्र मोदी नावाच्या नाण्याची बंदी करेल. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे सर्वोच्च न्यायालयातील एका माजी न्यायाधीशांनी सांगितले आहे. खरे तर हे  गजनी सरकार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगळे बोलतात. त्यांच्या आश्वासनाचे काय झालं, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. 

आता आम्हीही वाघनखे काढू शकतो-

अग्निविरांच्या माध्यमातून जवानांच्या भविष्यांशी खेळण्याचे धोरण तुम्ही केले. कंत्राटीकरण केले जात आहे. जवानांना सेवा करण्यासाठी पाच वर्षाची मुदत आणि तुम्ही पाचवर्षानंतर मुदतवाढ मागत आहात. ही जनता तुम्हाला चार जूननंतर कंत्राट मुक्त करेल. तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्षात दिले काय? आमच्या पाठीवर वार केला. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवसेना मोडीत काढण्याचे काम केलं. आम्ही तुम्हाला साथ दिली, त्याची भरपाई अशी करता. आम्ही तुम्हाला आलिंगन दिले आणि तुम्ही पाठीवर वार केला. आता आम्हीही वाघनखे काढू शकतो आणि ही वाघनखे पुढे बसले आहेत. 

राम कृष्ण हरी,  पाठवा यांना घरी!

ठाकरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये मुंबाजी होते. त्यांनी गाथा बुडवली. आता गोमूत्रधारी मानसिकतेची लोक घटना बदलायला निघाले आहेत. राम कृष्ण हरी, पाठवा यांना घरी, पेटवा मशाली, जय भवानी जय शिवाजी. जय भवानीवरून यांच्यात पोटात गोळा आला आहे. मुबंईत गुजरातची कंपनी मुंबईमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाही, अशी जाहिरात देते. ही कसली मानसिकता. आम्ही गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण अशा मानसिकतेच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल, शटर बंद केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जे शिवसेना नकली आहे असे म्हणतात, आम्ही त्यांना बेअकली आहे, असं म्हणतो निवडणूक आयोग हा घरगडी आहे. त्यांनी मिंधे चोरांच्या हाती धनुष्य दिला. त्याबद्दल माळ एक बातमी आली. त्यात मोदी आणि  शहा यांचे आभार मानतो, असे मिंधेनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यांनी तर धनुष्यबाण पळवल्याची कबुली दिली. आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत, जनतेला गद्दारी मान्य नाही. शिवसेना हे नाव आम्ही कधीही बदलू देणार नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळ