शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Hinjewadi Power Outage:हिंजवडी आयटीपार्कमध्ये चोवीस तास बत्ती गुल; याशवीन सोसायटीमधील हजारो नागरिकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:28 IST

Hinjewadi Power Outage: हा पुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. या घटनेमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाले.

हिंजवडी - आयटीपार्क फेज दोनमध्ये याशवीन सोसायटीमधील वीजपुरवठा सोमवारी (दि.६) दुपारी बाराच्या सुमारास खंडित झाला. तो पूर्ववत व्हायला चोवीस तास लागले. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो आयटीयन्सना मनस्ताप सहन करावा लागला तर, इमारतीमधील लिफ्ट बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि मुलांना त्रासाला सामोरे जावे लागले.

विद्युत बॅकअप संपल्याने काही महत्वाच्या ठिकाणी डिझेलवर चालणारे विद्युत जनित्र (जनरेटर) वापरावे लागले. मात्र, त्याला सुद्धा चाळीस हजार रुपये खर्च लागल्याने मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड हजारो सोसायटीधारकांना सोसावा लागला. याशविन सोसायटीधारकांनी मंगळवारी (दि.७) सकाळी प्रवेशद्वारावर एकत्र येत मेट्रो आणि महावितरण विरोधात संताप व्यक्त केला. दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे वादळी वारा, पाऊस किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती कारण नसून, सोसायटीजवळच मेट्रो स्टेशनसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे विद्युत केबल्स तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजते. तर, मेट्रो अधिकाऱ्यांना महावितरणकडून परिसरातील वीज वाहिन्या संदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा खोदकाम करताना केबल्स तुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांसह महावितरण विभाग सुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

हिंजवडी फेज २ मधील यशवीन सोसायटीत तब्बल चोवीस तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले. लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले, तर, बॅकअप संपल्याने रहिवाशांना रात्र अंधारात व उकाड्यात काढावी लागली. उन्हाळ्यामुळे अन्नपदार्थ, दूध व भाज्या खराब झाल्या. - अपर्णा कराळे, फेडरेशन सदस्य यशवीन बी, विंग  

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने, कॉमन एरिया लाइट आणि लिफ्टसाठी ४०० लीटर डिझेलचा खर्च झाला. विजेविना रात्रभर राहून डिझेलचा भुर्दंड भरावा लागला. हा प्रकार आजचा नाहीतर, निरंतर आम्हाला मेट्रो कामामुळे त्रास होत आहे - संदीप शेवाळकर : ए विंग, यशवीन सोसाइटी, माण 

फेज दोन याठिकाणी मेट्रो स्टेशनसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे, विद्युत केबल्स तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. खूप खोलवर काँक्रीट आणि दगड खाली केबल्स अडकल्याने वेळ लागला मात्र, सध्या, वीजपुरवठा सुरळीत केला आहे. मेट्रोच्या कामाचा यापूर्वी सुद्धा अनेकदा फटका बसला आहे.  - येनगे. एन. बी. : सहायक अभियंता, एमएसईबी, हिंजवडी विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Hinjewadi IT Park Plunged into Darkness: 24-Hour Power Outage

Web Summary : Hinjewadi IT Park residents faced a 24-hour power outage, disrupting work and daily life. Metro construction severed cables, sparking protests. Power restored after residents voiced anger against authorities for the disruption and demanded accountability.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPower Shutdownभारनियमन