शहरात पाणीकपात होण्याची शक्यता!

By Admin | Updated: March 4, 2016 00:25 IST2016-03-04T00:25:22+5:302016-03-04T00:25:22+5:30

गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा पंधरा टक्क्यांनी कमी झाला आहे.

The possibility of a waterfall in the city! | शहरात पाणीकपात होण्याची शक्यता!

शहरात पाणीकपात होण्याची शक्यता!

पिंपरी : गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा पंधरा टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे तातडीने बैठक बोलावण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत पाणी कपात करायची की नाही, याबाबत निर्णय होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३.५९ टीमसी पाणीसाठा असून, ४२.११ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ४.९१ टीएमसी पाणीसाठा असून, ५७.७० टक्के पाणी उपलब्ध आहे. दररोज धरणातून २६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा १५.५० टक्के कमी आहे. पवना नदीतून हे पाणी रावेत येथील बंधाऱ्यात येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. हे पाणी शहरातील विविध भागात पाणी पुरविले जाते. दिवसातून एक वेळ पाणी केले असले, तरी सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल, असे पाटबंधारे विभागाचे मत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The possibility of a waterfall in the city!