महिलेशी अश्लील संभाषण; ‘त्या’ पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:47 IST2018-10-15T01:47:33+5:302018-10-15T01:47:49+5:30

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच मध्यरात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून ...

Pornographic conversation with a woman; police arrested | महिलेशी अश्लील संभाषण; ‘त्या’ पोलिसाला अटक

महिलेशी अश्लील संभाषण; ‘त्या’ पोलिसाला अटक

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच मध्यरात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संभाषण केले. याप्रकरणी साने चौक पोलीस चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, अटक करण्यात आली आहे.
महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी तातडीने दखल घेत पालवे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती व पत्नीचे भांडण झाले. त्यामुळे ९ आॅक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला पोलीस चौकीत तक्रार नोंदविण्यास गेली. तेथे रामनाथ पालवे होते. त्यांनी महिलेचे म्हणणे ऐकून घेत असताना, गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असल्याने ही महिला घाबरली.
पोलीस अधिकाऱ्याचे वर्तन ठीक नसल्याने तक्रार नोंदवून ही महिला ११ च्या सुमारास तेथून निघून गेली. तक्रार अर्जावर महिलेने
तिचा मोबाइल क्रमांक दिला होता. रामनाथ पालवे यांनी त्याच रात्री दोनच्या सुमारास महिलेशी मोबाइलवरून संपर्क साधला. तिच्याशी अश्लील संभाषण केले. त्यामुळे पोलीस अधिकारी पालवे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Pornographic conversation with a woman; police arrested