शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: December 16, 2024 18:47 IST

हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले

पिंपरी : हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडीपोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये १८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात पोलिसाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल केला. हिंजवडी येथे ही कारवाई रविवारी (दि. १५) दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली. वैभव प्रल्हाद वारडे (३९, रा. गुरुव्दारा रस्ता, आकुर्डी निगडी), हाॅटेलचा व्यवस्थापक सोहम दीपक कदम (२३, रा. वाकड पोलिस लाइन, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार आकाश हंबर्डे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ (डब्ल्यू)सह १३१ सह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार वाणिज्य व पुरवठा विनियमन) अनिधिनयमचे कलम ४, ७, २१ व सुधारणा अधिनियम सन २०१८ चे ४ (अ), २१ (अ) अन्वये पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सोहम दीपक कदम हा हाॅटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचे दिवंगत वडील दीपक कदम हे पोलिस होते. ते वाकड येथील पोलिस वसाहतीमध्ये वास्तव्यास होते.  संशयित व्यवस्थापक सोहम कदम आणि वैभव वारडे यांनी त्यांच्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर चालवले. याबाबत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. या कारवाई मध्ये १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले. सहायक पोलिस निरीक्षक पुनम जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकhotelहॉटेलhinjawadiहिंजवडी