शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

Police Recruitment 2021: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:48 IST

गेली अनेक दिवसांपासून परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती

पिंपरी: राज्य शासनाकडून पोलीस भरती (police bharti 2021 केली जात आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी शनिवार, दि. २३ ऑक्टोबरला ऑफलाईन लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यांनी दिली. परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि. ४) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली.  (Maharashtra Police Recruitment 2021)  

पुणे ग्रामीण व शहर पोलीस दलाचे विभाजन करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडली. मात्र आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. परीक्षा केंद्र निश्चित करून आवश्यक यंत्रणा तसेच मोठा बंदोबस्त देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. 

लेखी परीक्षेची तारीख, वेळशनिवार, दि. २३ ऑक्टोबर, वेळ दुपारी : ३ वाजता  

आयुक्तालयात भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या जागासर्वसाधारण - १७६महिला - २१६खेळाडू - ३८प्रकल्पग्रस्त - ३८भूकंपग्रस्त - १४माजी सैनिक - १०७अंशकालीन पदवीधर - ७१पोलीस पाल्य - २२गृहरक्षक दल - ३८

लेखी परीक्षेसाठी १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र इतर घटकांकडून त्याच दिवशी परीक्षा होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून २३ ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड