शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune crime: अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय म्हणत घातला पोलिसांनाच गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:01 IST

आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला...

पिंपरी : मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयिसंग साहेब बोलतोय, असे सांगून पैसे उकळणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खबऱ्या असल्याची बतावणी करून त्याने वारंवार पोलिसांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कामगिरी केली. खलीउल्लाहा अयानुल्लाह खान (वय ४२, रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला. मी अहमदाबाद पोलीस आयुक्‍त विजयसिंग साहेब बोलतोय,  आपल्या पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर द्या, असा कॉल आरोपीने केला. त्यानुसार पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा कॉल केला. तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो, परंतू ते माझा फोन उचलत नाहीत. पिपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात पिस्तूलची डिल करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी माहिती द्यायची आहे. तुमच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर मला द्या, असे आरोपीने सांगितले.

त्यानुसार त्याला अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन केला. मी पोलीस आयुक्‍तांना २५ वेळा फोन केला. परंतू ते फोन उचलत नाहीत, असे आरोपी म्हणाला. मी गुप्त खबऱ्या बोलतोय, तुमच्या हद्दीमध्ये पिस्तूलची अवैध विक्री होणार आहे, असे सांगून त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या व्हॉट्सअपवर पिस्तूल विक्री करणाऱ्या इसमांचे फोटो, गाडीचा फोटो व पिस्तूलचे खोटे फोटो पाठविले. तसेच पैशांची मागणी केली.

आरोपीबाबत संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हा गोरेगांव, मुंबई येथे असल्याचे समोर आल्याने पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. त्यानंतर आरोपीचा विश्वास संपादन करण्यासाठी २४ हजार रुपये त्याच्या पेटीएम व गुगलपेवर पाठविले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक केली असल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्या विरुद्ध मुंबई येथील मालाड, गोरेगाव, ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

आरोपी हा ऑनलाईन पध्दतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करायचा आणि पोलीस नियंत्रण कक्षाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधायचा. माझ्याकडे पिस्तूलचे काम आहे, अशी बतावणी करायचा. त्यानंतर पैशांची मागणी करून पोलिसांची ऑनलाईन पध्दतीने फसवणूक करायचा. पोलिसांचा गुप्त खबऱ्या असल्याची बतावणी करून सन २०१५ पासून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे आरोपीने कबुल केले आहे. 

पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सागर पानमंद, प्रदिपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी