शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस नियंत्रण कक्षालाही 'फेक कॉल'चं ग्रहण ; पती-पत्नी वादाच्या सर्वाधिक कॉलनं पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:30 IST

पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर 'फेक कॉल' करून पोलिसांना नाहक त्रास देण्याचा प्रकार समोर...

नारायण बडगुजर - पिंपरी : तत्काळ मदत उपलब्ध व्हावी म्हणून पोलिसांकडून नियंत्रण कक्षाचा क्रमांक उपबल्ध करून देण्यात आला आहे. मात्र या क्रमांकावर फेक कॉल करून पोलिसांना नाहक त्रास देण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा फेक कॉल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल केले आहेत.

किरकोळ कारणावरून वाद झाला तरीही पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला जातो. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे त्याबाबत माहिती दिली जाते. पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. मात्र किरकोळ प्रकार असल्याचे समोर येते. यात पोलिसांचा व संबंधित यंत्रणेचा वेळ खर्च होतो.

महिलाही करतात कॉल छेड काढली जातेय, सासरच्यांकडून छळ होतोय, अशा विविध कारणांसाठी महिलांकडून कॉल केले जातात. त्यांनाही पोलिसांकडून तत्काळ मदत केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच वाद मिटलेला असतो. काही घडलेच नाही, आम्ही मिटवून घेतले, असे सांगितले जाते.      

अत्यावश्यक वेळी कॉल करावानागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. मात्र काही नागरिक किरकोळ कारणांसाठीही नियंत्रण कक्षाला फोन करतात. अत्यावश्यक वेळी तसेच संकट काळात कॉल करावा. जेणेकरून पोलिसांचा वेळ वाचून अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

शेजाऱ्यांची वाद झाल्याचे कॉलशेजारधर्म पाळत शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असावेत, असे सागंण्यात येते. मात्र शहरात शेजाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होतात. त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा वाद सोडविण्यासाठी घटनास्थळी धाव घ्यावी लागते.

दररोज किमान पाच फेक कॉलपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या प्रत्येक कॉलची नोंद केली जाते. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील नोंदवून घेतली जाते. यात फेक कॉल करणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहेत. असे दररोज किमान पाच फेक कॉल नियंत्रण कक्षाला प्राप्त होतात. त्याबाबत गुन्हे दाखल केले जातात.

नियंत्रण कक्षाला फोन करून एकाने पोलिसांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फेक काॅल प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे.

कंट्रोल रुमला आलेले कॉलजून - ४४०९जुलै - ४०००१० ऑगस्टपर्यंत - १३२२

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस