शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वडील अमेरिकेत अडकल्याने पोलिसांनीच साजरा केला मुलाचा वाढदिवस..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:05 IST

आपला हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही...

ठळक मुद्देसांगवी पोलिसांनी वत्सल याच्या वाढदिवसाची केली जोरदार तयारी

पिंपरी : लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपला वाढदिवस घरातच साजरा करावा लागत आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होत आहे. मात्र हेच पोलीस जेव्हा केक घेऊन येतात आणि वाढदिवस साजरा करतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवून देतानाच सर्वसामान्यांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. असाच एक प्रसंग सांगवी येथील नागरिकांना अनुभवण्यास मिळाला.

लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या वडिलांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी ई-मेलव्दारे केली. त्यानुसार रविवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत पोलिसांनी शुभेच्छा दिल्या. वत्सल शर्मा असे वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सल याचे वडील अमेरिकेत अडकलेले आहेत. वत्सल याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना आपला मुलगा वत्सल याला शुभेच्छा देता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी पिंपरी - चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती देण्यात आली. सांगवी पोलिसांनी वत्सल याच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत असलेल्या वत्सलच्या घरी गेले. वडिलांचा वाढदिवसाचा मेसेज वत्सला याला दिला. तसेच त्याला इमारतीच्या पार्किंगमध्ये बोलावून पोलिसांच्या गाडीवरच केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोसायटीतील नागरिकही यात सहभागी झाले.पोलिसांनी अशा अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. त्यामुळे  वत्सल भारावून गेला होता. वडिलांसह पोलिसांचेही त्याने आभार मानले. आपला हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही, अशी भावना त्याने पोलिसांकडे व्यक्त केली.

टॅग्स :SangviसांगवीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस