शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड येथे पोलिसांनी पाठलाग करून पकडले मोबाईल चोरट्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 18:32 IST

दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच गाठले आरोपीला

ठळक मुद्देआरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार 

पिंपरी : रिक्षाच्या प्रतीक्षेत रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल फोन हिसकावून चोरटा पळून जात होता. त्यामुळे प्रवाशाने आरडाओरडा केला. त्यावेळी तेथून जात असताना रात्रगस्तीवरील पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले. काळभोरनगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. १४) पहाटे सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. अभिजित सोमनाथ दौंड (वय १८) असे पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार गणेश जाधव (वय २२, दोघे रा. आकुर्डी) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दौंड याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पांडुरंग साहेबराव जाधव (वय ४२, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी प्रवासासाठी मोबाइल अँपव्दारे ऑनलाइन रिक्षा बुक केली होती. काळभोरनगर येथे रिक्षाची प्रतीक्षा करीत असताना दुचाकीवरून आरोपी अभिजित दौंड व गणेश जाधव हे दोघे तेथे आले. यातील गणेश जाधव दुचाकी चालवत होता. त्याने फिर्यादी पांडुरंग जाधव यांच्यापासून काही अंतरावर दुचाकी थांबविली. दुचाकीवरून उतरून आरोपी दौंड याने पांडुरंग यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडील बळजबरीने हिसकावला. त्यानंतर तेथून पळून जात दुचाकीकडे त्याने धाव घेतली. याप्रकारामुळे पांडुरंग यांनी आरडाओरडा केला. त्याचवेळी पिंपरी पोलिसांची रात्रगस्तीवरील पथकाची गाडी तेथून जात होती. पोलिसांची गाडी थांबल्याचे पाहून दुचाकीचालक आरोपी गणेश जाधव याने दुचाकीवरून धूम ठोकली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.

दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच गाठले आरोपीलापांडुरंग जाधव यांना आरडाओरडा करताना पाहून गस्तीवरील पथकाने त्यांची गाडी तेथे थांबविली. मोबाइल फोन हिसकावून चोरून नेला असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार, त्यांच्या वाहनावरील पोलीस कर्मचारी भरत सोनवणे आणि पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव यांनी पळून जात असलेल्या आरोपी अभिजित दौंड याचा पाठलाग केला. काही अंतरावर दुचाकी घेऊन आरोपी गणेश जाधव थांबला होता. मात्र त्या दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच आरोपी अभिजित याला पोलिसांनी शिताफीने पकडले. 

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांनी अटक केलेला आरोपी अभिजित दौंड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरोडा प्रकरणी हा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMobileमोबाइलtheftचोरीPoliceपोलिस