शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"कुछ दिन और सही... बहोत बडा धमाका होगा.." ; पिंपरीत 'बर्थ डे' च्या दिवशी भाईला घडली तुरुंगवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:20 IST

सोशल मीडियावर पोस्टचा धमाका अन् पोलिसांच्या कारवाईचा धडाका

पिंपरी : वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर भाईगिरी करणे महागात पडू शकते. याचाच प्रत्यय निगडी येथे आला. सराईत गुन्हेगाराने त्याच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे त्याचा वाढदिवस त्याला पोलीस कोठडीत काढावा लागला.

अजय विलास काळभोर (वय २७, रा. चिंचवड), अनिल प्रशांत सोनावणे (वय २४, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सोमनाथ राजू देवाडे (वय २१, रा. गणेशनगर, चिंचवड), अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय काळभोर याने त्याच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर पोस्ट टाकली. कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा, अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टमध्ये होता. तसेच त्याचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली. भाऊ आमचा, बाप तुमचा, अशी पोस्ट त्याने टाकली. तसेच आरोपी देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता.

आरोपींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत अपर पोलीस आयुक्तन रामनाथ पोकळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त  सुधीर हिरेमठ यांना माहिती मिळाली. त्यांनी सराईत गुन्हेगार आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रशांत सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्तच डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या सूचनेनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.तीनही आरोपींना बुधवारी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायलयाने त्यांना चांगल्या वागणुकीची हमी घेत जामिनावर सोडून दिले. मात्र महिनाभर तीनही आरोपींना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास मनाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसArrestअटक