रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:27 IST2017-12-04T16:21:48+5:302017-12-04T16:27:18+5:30

रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The poisoning in wedding dinner; Treat the woman in the ICU section, ravet | रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार

रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार

ठळक मुद्देविषबाधा झालेल्यांत चार महिला व तीन बालकांचा समावेशएका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर

किवळे : रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांत चार महिला व तीन बालकांचा समावेश आहे. यातील एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून इतरांची प्रकृती स्थिर आहे. 
रावेत येथील एका खासगी मंगल कार्यालयात रविवारी विवाह समारंभ होता. या सोहळ्यात दुपारी शेवटची पंगत झाली. या पंगतीत जेवण केलेल्या सुमारे चौदा जणांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या-जुलाब आदी त्रास होऊ लागल्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चौघांना उपारानंतर सोडून देण्यात आले. तर इतरांना दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत. एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत रूग्ण दाखल होणे सुरूच होते.

Web Title: The poisoning in wedding dinner; Treat the woman in the ICU section, ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.