नागपूरनजिकच्या मौदा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:33 PM2017-11-22T12:33:35+5:302017-11-22T12:33:57+5:30

नागपूरजवळच्या मौदा तालुक्यातील तोंडली या गावात शाळा सुटल्यानंतर खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा झाली.

22 students have been poisoned due to the eating of seeds at Nagpur | नागपूरनजिकच्या मौदा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा

नागपूरनजिकच्या मौदा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा

Next

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूरजवळच्या मौदा तालुक्यातील तोंडली या गावात शाळा सुटल्यानंतर खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा झाली. या सर्व मुलांनी ओकाऱ्या करायला सुरुवात केल्याने त्यांना कोदामेंढी आणि खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. खात येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. कोदामेंढी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने मुलांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली होती. सर्वांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
विषबाधा झालेल्या मुलांमध्ये सानिया कारूजी बाबरे (१०), साहील जगनाडे (९), नक्ष प्रमोद जवजारे, ऋषी राजेश शेंडे (५), संस्कार जगदीश शेंडे (५), समर जीवन उके (६), सिद्धार्थ जीवन उके (५), आउस दिलीप धांडे (९), दीपासू ज्ञानेश्वर ठवकर (६), समिक्षा ज्ञानेश्वर ठवकर (१०), समीर राजू आखले, नयन महेश जवजारे, मधुकर लोहकरे, राजू आखले, सुजन श्रावण ईश्वरकर (८) सर्व रा. तोंडली, ता. मौदा यांच्यासह अन्य सात मुलांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाही.
हे सर्व मुले गावालगतच्या मोकळ्या जागेवर नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खेळत होती. शेजारी चंद्रज्योतीची झाडे असल्याने तसेच त्या झाडांना फळे असल्याने काहींनी चंद्रज्योतीच्या बिया खायला सुरुवात केली. त्या बिया चवीला चांगल्या लागत असल्याने इतर मुलांनीही त्या खाल्ल्या.
खेळणे आटोपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास या मुलांना एका पाठोपाठ एक अशा ओकाऱ्या व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिणामी, पालकांनी १७ मुलांना कोदामेंढी आणि पाच मुलांना खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
खात येथे चार मुलांवर प्रथमोपचार करून त्यांना लगेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. या आरोग्य केंद्रात सध्या सुजल ईश्वरकर याच्यावर उपचार सुरू आहे.
दुसरीकडे १७ मुलांना कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, त्या आरोग्य केंद्रात एकाही डॉक्टर हजर नसल्याने कुाावरही प्रथमोपचार करण्यात आले नाही.
त्यामुळे या सर्व मुलांना लगेच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या सर्व मुलरंची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


कोदामेंढीतील डॉक्टर बेपत्ता
कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे. मंगळवारी रात्री या दोनपैकी एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. त्यामुळे येथे उपचारासाठी आणलेल्या १७ मुलांच्या पालकांची मोठी गैरसोय झाली. या प्रकाराची माहिती मिळताच अशोक हटवार यांच्यासह कोदामेंढी येथील नागरिकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांनी सर्व मुलांना भंडारा येथे पोहोचविण्यासाठी पालकांना मदत केली. या आरोग्य केंद्रातील दोन्ही डॉक्टर नेहमीच बेपत्ता राहात असून, दोघेही कधीच मुख्यालयी राहात नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या प्रकारामुळे पालकांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केला. दुसरीकडे कोदामेंढीचे सरपंच भगवान बावनकुळे यांनी आरोग्य केंद्रातील भेट पुस्तिकेत तक्रार नोंदवली आहे. शिवाय, या प्रकाराची माहिती फोनवर अरोली पोलिसांना दिली.


आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
या प्रकारामुळे कोदामेंढी येथील नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. या आरोग्य केंद्रात डॉक्टर राहात नसल्याने स्थानिक व परिसरातील गरीब रुग्णांची मोठी परवड होते. उपचाराचराअभावी कोदामेंढी येथील एका नागरिकाचा १५ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. अनेक गरीब रुग्णांना डॉक्टर नसल्याने उपचारासाठी खासगी डॉक्टरकडे जावे लागत असून, त्यासाठी पदरमोड करावी लागते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री १० वाजताच्या सुमारास या आरोग्य केंद्राला चक्क कुलूप ठोकले
 

Web Title: 22 students have been poisoned due to the eating of seeds at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य