शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 20:32 IST

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे

पिंपरी :पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी नागरी मतदार संघात (पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका) मतमोजणी झाली. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही प्रत्येकाला १३ चा कोटा असताना सहा सदस्यांना कोट्यापेक्षा आठ  मते कमी पडली आहेत. त्यामुळे कोणाची मते फुटली. याचा शोध सत्ताधारी पक्षाकडून घेतला जात आहे.

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी  मतदान झाले. मोठे नागरी मतदार संघासाठी (महापालिका) पुणे आणि पिंपरी महापालिका मुख्यालयात मतदान झाले. या मतदारसंघात  २२ जागा असून २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे ६ आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे ९ उमेदवार रिंगणात होते.

पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पिंपरीत ९८ टक्के मतदान झाले. १२४ नगरसेवकांपैकी १२२ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर, परगावी असल्याने शिवसेनेचे १आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ असे २ नगरसेवक मतदान करु शकले नाहीत.  या निवडणुकीची मतमोजणी आज झाली.

निर्वाचित सदस्य-सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, वसंत बोराटे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापालिकेत १२८ नगरसेवक होते. त्यातील भाजप २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ अशा ४ नगरसेवकांचे निधन झाले होते. महापालिकेत १२४ नगरसेवक असून त्यातील १२२ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १ नगरसेवक बाहेर असल्याने मतदान करु शकले नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडूण आले आहेत.पिंपरी-चिंचवडमधील मत पडली कमीचिंचवड विधानसभेतील नामदेव ढाके यांना १३ मतांचा कोटा होता. त्यांना १२ मते पडली. तर संदीप कस्पटे यांना १३ चा कोटा होता. त्यांना ११ मते पडली. चंद्रकांत नखाते यांना १३ चा कोटा होता. त्यांना १० मते पडली. तर पिंपरी विधानसभेतील जयश्री गावडे यांना १३ चा कोटा होता. त्यांना ११ मते पडली. तर भोसरी मतदार संघातील निर्मला गायकवाड यांना १३ चा कोटा होता. त्यांना १४ मते पडली. तर वसंत बोराटे यांना १२ चा कोटा होता. त्यांना १२ मते पडली. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेत आठ मते कमी पडली. कोणाची मते कमी पडली कोणाची फुटली याचा शोध पक्षश्रेष्ठी घेत आ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाPMRDAपीएमआरडीएElectionनिवडणूकPuneपुणेVotingमतदान