शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला मिळणार ६ आगार

By admin | Updated: August 8, 2015 00:35 IST

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवाशांचा गाडा ओढणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) लवकर आणखी सहा सुसज्ज आगार मिळणार आहेत

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवाशांचा गाडा ओढणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) लवकर आणखी सहा सुसज्ज आगार मिळणार आहेत. शेवाळवाडी, भेकराईनगर, बालेवाडी, शिंदेवाडी, सुस रस्ता आणि अप्पर इंदिरानगर येथे हे सहा आगार पुढील चार ते सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने उभारले जाणार आहेत. वर्कशॉपसह हे सहाही आगार कार्यान्वित केले जाणार असल्याने सध्याच्या दहा आगारांवरील मोठा ताण कमी होणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या प्रशासनाने दिली. पुण्यात सार्वजनिक बसवाहतुक सुरू झाल्यानंतर पहिले सुसज्ज आगार स्वारगेट येथे सुरू झाले. त्यानंतर शहराचा विकास होत गेला, तसे बसेसची संख्याही वाढत गेली. त्यानुसार नवीन आगार सुरू करण्यात आले. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्येही बसवाहतुक सुरू झाल्यानंतर आगार तयार करण्यात आले. पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण झाल्यानंतर ‘पीएमपी’अंतर्गत पुणे शहरातील सात तर पिंपरी चिंचवडमध्ये मधील तीन आगारांचा समावेश झाला. या दोन्ही शहरांतील शेवटचे आगार पुणे स्टेशन येथे २००४ मध्ये सुरू झाले. त्यानंतर आजपर्यंत प्रवासी संख्या व बसेसमध्ये मोठी वाढ होवूनही नवीन आगार निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या आगारांवरच मोठा ताण पडत आहे. यापार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने नवीन सहा आगार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याविषयी बोलताना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, सध्या भेकराईनगर व शेवाळवाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात आगार तयार करण्यात आले आहे. तर बालेवाडी, शिंदेवाडी व अप्पर इंदिरानगर येथे बसस्थानक सुरू झाले आहे. सुस रस्ता येथेही लवकरच स्थानक सुरू केले जाईल. टप्प्याटप्याने या सहाही ठिकाणी वर्कशॉपसह आगार तयार केले जाईल. (प्रतिनिधी)