शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पीएमपी बसची दुप्पट भाडेवाढ;प्रवाशांच्या खिशाला झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:31 IST

- सीएनजी आणि डिझेलच्या किमती वाढल्याचा परिणाम; २०१४ नंतर आता वाढ झाल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

पिंपरी : पीएमपीएमएल प्रशासनाने बसभाड्यात दुपटीने वाढ केली आहे. आधी दोन किलोमीटरच्या टप्प्याला पाच रुपये भाडे होते. मात्र, आता पाच किलोमीटरचा टप्पा केला असून, त्यासाठी १० रुपये भाडे आकारले जाईल. रविवार, १ जूनपासून ही भाडेवाढ लागू झाली असून, मासिक व एक दिवसाच्या पासचेही दर वाढले आहेत. यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. सीएनजी व डिझेलच्या किमती वाढल्या असून, २०१४ नंतर आता भाडेवाढ केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बसच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. लांबच्या प्रवासासाठी दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, जवळच्या प्रवासासाठी तिकीटदर कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, निगडी व भोसरी येथील पीएमपी आगारातून ९६ मार्गांवर ३९१ बस धावत असून, त्यांच्या दररोज ४,३९२ फेऱ्या होतात. या आगारांतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बस जातात. नवीन भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

प्रमुख पीएमपी मार्ग - आधीचे भाडे - नवीन भाडे

पिंपरी - महाळुंगे - ३० - ६०हिंजवडी - आळंदी - ४५ - ७०

चिखली - पुणे स्टेशन - ३५ - ५०पिंपरीगाव - मार्केट यार्ड - ३५ - ६०

चिंचवडगाव - कात्रज - ३५ - ६०भोसरी - हिंजवडी - ३० - ५०

भोसरी - कात्रज             - ३५ - ६०भोसरी - हडपसर - ४० - ७०

भोसरी - पुणे स्टेशन - २५ - ४०भोसरी - राजगुरूनगर - ४० - ६०

निगडी-लोणावळा - ६७ - ८२निगडी - तळेगाव - २६ - ४१

निगडी - वडगाव - ३१ - ५१निगडी - पुणे स्टेशन - ३० - ५०

निगडी - स्वारगेट - ३० - ५०निगडी - पिंपरी - १० - २०

निगडी - कात्रज - ४० - ८०निगडी - वाघोली - ३५ - ७०

निगडी - शिवाजीनगर - २५ - ४०निगडी - महाळुंगे - २० - ४०

मुकाई चौक - मनपा - ३० - ५०निगडी - नवलाख उंब्रे - ४६ - ७१

निगडी - देहूगाव - २० - ३०निगडी - किवळे - १५ - ३०

चिंचवडगाव - पुणे मनपा - ३० - ४०कमी झालेले बसभाडे

चिंचवडगाव-डांगे चौक : १० - ५चिंचवडगाव-औंध हाॅस्पिटल : २० - १०

 - शहरातून दररोज धावणाऱ्या बस - ३९१

- एकूण मार्ग (रुट) - ९६- एकूण फेऱ्या - ४,३९२ मासिक पासचे दर असे राहतील...पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आधी मासिक पासचा (सर्व मार्ग) दर ९०० रुपये, तर पुणे महापालिका हद्दीसाठी १२०० रुपये होता. मात्र, आता १,५०० रुपयांच्या एकच पासमध्ये दोन्ही महापालिका समाविष्ट केल्या आहेत. दोन्ही महापालिका व ग्रामीण भागासाठी आधीचाच २,७०० रुपये दर ठेवला आहे. आधी एका दिवसाच्या पासचा दर पिंपरी-चिंचवडसाठी ४०, दोन्ही महापालिकांसाठी ५० रुपये तर दोन महापालिका व ग्रामीण भागासाठी ७० रुपये होता. मात्र, आता दोन महापालिका ७० व ग्रामीणसह १२० रुपये करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड