शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पीएमपी बसमधून पुन्हा आॅईलगळती; दुचाकी घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:41 AM

अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी दाखविली समयसूचकता; प्रशासनाचे दुर्लक्ष

वाकड : सलग दुसऱ्या आठवड्यातही थेरगावातील डांगे चौक रस्त्यावर पीएमपी बसमधून आॅईलगळती झाल्याने निसरडा झालेला रस्ता एका सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशामक दलाच्या साह्याने स्वच्छ करून घेतल्याने येथील अनेक अपघात टळले. रस्त्यावर आॅईल सांडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. पीएमपीच्या बसमधून आॅईलगळती होत आहे. त्यामुळे सुस्थिीतील पीएमपी बस या मार्गावर सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.डांगे चौक बस थांबा ते चिंचवडगावदरम्यान पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणात आॅईलगळती झाली. आॅईल पसरून रस्ता निसरडा झाल्याने त्यावर घसरून अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. ही बाब थेरगाव सोशल फाउंडेशन (टीएसफ) सदस्य हेल्परायडर यांना समजताच त्यांनी अग्निशामक दलाला कळवून तातडीने घटनास्थळी २ वाहने बोलवून घेतले. तत्पूर्वी उपाययोजना वखबरदारी म्हणून फाउंडेशनचे सदस्य, बसचालक व वाहक यांच्या मदतीने बस बाजूला घेऊन सांडलेल्या आॅईलवर तत्परतेने माती टाकण्यात आली. वाहतूक दुसºया बाजूने वळवून होणारे अपघात रोखण्यात आले व त्यानंतर तो रस्ता पूर्णपणे स्वच्छ करून घेत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नीलेश पिंगळे, शंतनू तेलंग, यश कुदळे, अनिल घोडेकर, सुशांत पांडे, पिंटू ननावरे, महेश येळवंडे, युवराज पाटील यांनी परिश्रम घेतले. या सहकार्याबद्दल वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.पीएमपीच्या जुन्या बसमुळे वाढले अपघातपीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. अशा बस भर रस्त्यात बंद पडतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास होतो. भर रस्त्यातील अशा बंद बसमुळे अपघाताचा धोकाही असतो. पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. जुन्या बस सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र असे असतानाही पीएमपी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढजुन्या पीएमपी बसमुळे शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या बसमधून विषारी धूर सोडण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. तसेच यातील काही बसच्या इंजिनचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना आवाजाचाही त्रास सहन करावा लागतो. आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.पिंपरी-चिंचवडकरांना सापत्न वागणूकपिंपरी-चिंचवडकरांना पीएमपी प्रशासनाकडून सातत्याने सापत्न वागणूक देण्यात येत आहे. शहरातील अनेक मार्गांवर नवीन बसच्या फेºयांची मागणी असतानाही जुनाट आणि नादुरुस्त बस सोडण्यात येतात. काही ठरावीक मार्गांवर वर्षानुवर्षे अशा बस सोडण्यात येतात. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना सातत्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे.सर्व्हिस व्हॅन येते उशिरानेबस बंद पडल्यानंतर नजिकच्या आगारातून सर्व्हिस व्हॅन ताबडतोब येणे अपेक्षित असते. मात्र त्यातही दिरंगाई केली जाते. बहुतांश वेळा बस दोन दिवस बंद अवस्थेत भर रस्त्यात असते. तरीही त्याबाबत उदासीनता दाखविण्यात येते. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. अशावेळी संबंधित बसचे चालक आणि वाहक यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.बस आहेत की, बॉम्ब?पीएमपीच्या बसमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक अपघातांचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या बस धावत असतानाच अचानक पेट घेतात. डिझेल तसेच सीएनजी बसचाही यात समावेश आहे. शॉर्टसर्किट होऊन किंवा अन्य कारणाने बसने पेट घेतल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या या बस आहेत की बॉम्ब, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्था करण्यातही दिरंगाईपीएमपी बस रस्त्यात बंद पडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात येत नाही. त्यामुळे अशा बसमधील प्रवाशांना भर रस्त्यात ताटकळावे लागते. बहुतांशवेळा प्रवाशांना खासगी वाहनाने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. अशावेळी या प्रवाशांना बसभाड्यासह रिक्षाचेही भाडे अदा करावे लागते. मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.कारभार सुधारण्यात उदासीनतापीएमपीचा कारभार सुधारण्याबाबत संबंधित प्रशासनाच्या आणि यंत्रणेच्या सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच शासनाने निधी उपलब्ध करून देऊन आणि नवीन बस दाखल होऊनही जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे. बसच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या उदासीनतेमुळेच पीएमपी खिळखिळी झाली आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड